संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार- माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८८ वर्षांचे होते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ते सलग ९ वेळा निवडून आले होते. २०१४ ला मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सलग १० वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा विश्वविक्रम हुकला.

माणिकराव गावित नंदुरबारमधून काँग्रेसच्या तिकिटावर सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे नंदुरबार आणि काँग्रेस हे समीकरण तयार झाले होते. नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. माणिकराव गावितांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी मंत्रीपदे त्यांना मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषविले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली व ते विजयी झाले. त्यानंतर सलग ९ वेळा त्यांनी नंदुरबारमधून खासदार म्हणून निवडणूका जिंकल्या. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोदी लाटेचा फटका बसला. ते पराभूत झाले. त्यामुळे सलग १० वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा त्यांचा विश्वविक्रम हुकला. २०१९ मध्ये त्यांचे पुत्र भरत गावित यांनी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पडवी यांना तिकीट दिले. त्यामुळे भरत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर माणिकराव गावितांची मुलगी निर्मलाने शिवसेनेत प्रवेश केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami