संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

ज्ञानवापी मशिद प्रकरणाचा निकाल आता ८ नोव्हेंबरला वाराणसी कोर्टात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाराणसी – येथील ज्ञानवापी मशीद संकुलात कथितरीत्या आढळलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर वाराणसी जलदगती न्यायालय येत्या ८ नोव्हेंबरला निकाल देणार आहे.या ज्ञानवापी- शृंगार गौरी प्रकरणात जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी याचिकेवरील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले आणि निर्णय ८ नोव्हेंबपर्यंत राखून ठेवला, अशी माहिती याचिका दाखल करणाऱ्या हिंदू पक्षाची बाजू मांडणारे अ‍ॅड. अनुपम द्विवेदी यांनी दिली.
विश्व वेदीक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी गेल्या २४ मे रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ज्ञानवापी मशिदीत मुस्लीम नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची आणि मशीद परिसर सनातन संघाच्या ताब्यात देण्याची आणि शिवलिंगाची पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश विश्वेश यांनी सनातन संघाची याचिका जलदगती न्यायालयाकडे वर्ग केली होती. त्यावर या वाराणसीचे दिवाणी न्यायाधीश महेंद्र पांडे यांच्यासमोर काल गुरुवारी सुनावणी झाला.या खटल्यात हिंदू पक्षाची बाजू १५ ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी मांडली गेली होती.त्यानंतर न्यायाधीश वरीष्ठ विभागाने २७ ऑक्टोबर ही तारीख निकालासाठी निश्चित केली होती.पण ती आता ८ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami