वाराणसी- अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद समितीच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवार 19 ऑक्टोबरला होणार आहे. अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने कोर्टाकडे वेळ मागितला. यावेळी न्यायमूर्ती जे.जे. मुनीर यांनी मशीद समितीच्या वकिलांना वाराणसी कोर्टात दाखल केलेल्या रेकॉर्डची कागदपत्रे बुधवार 19 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश दिले.