दोडा- दोडा जिल्ह्यातील थाथरी नगरपालिकेतील नयी बस्ती परिसर खचू लागल्याने डझनभर घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे 20 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास गावाच्या खाली मोठी दरड कोसळल्याने काही घरांची पडझड झाली. त्यामुळे सुमारे 50 ते 60 घरे असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्यांच्या बांधकामात यंत्रसामग्रीचा वापर, तसेच पाणी साचणे यासह विविध कारणांमुळे हा परिसर सतत खचत चालला आहे. परिणामी गावाखालील रस्ते खराब होत आहेत.स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन बाधित स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.सरकारी अधिकारी अमीन जरगर यांनी सांगितले की लोकांना शिबिरांमध्ये आणि तंबूंमध्ये हलवले आहे. या परिसरात ज्या घटना दिसून येत आहे त्या दुरूस्तीच्या पलीकडे आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव स्थलांतरित केले जात आहे. त्यासाठी उपायुक्त दोडा यांनी आधीच आवश्यक निर्देश दिले आहेत.रहिवाशांनी जागा आणि संरचनेसाठी पुनर्स्थापना आणि नुकसान भरपाईची मागणी केलीआहे .त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतील.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये एकीकडे जोशीमठ येथील भूस्खलनाचे प्रकरण सुरु आहे. नैनितालच्या लोअर मालरोडमध्ये भूस्खलन पुन्हा सक्रिय झाल्यामुळे इमारतींना पडलेल्या भेगांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.