संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जे.पी.नड्डा यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. 15 आणि 16 ऑक्टोबर या दिवशी नड्डा मुंबईत येणार आहेत.मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिका निवडणुकींच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. याशिवाय लोकसभा निवडणूकीच्या मिशन 45च्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक घेणार आहेत.

राज्यात राजकीय समीकरण बदलले असून भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. त्यानंतर भाजपचे केंद्रीय नेते महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. 2024 मधील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे महाराष्ट्रात मिशन 45 असे टार्गेट आहे. हे टार्गेट पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री मुंबईत येत आहेत.दरम्यान 15 आणि 16 ऑक्टोबरला जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये महापालिकेंच्या निवडणूका आणि इतर स्थानिक संस्थानांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नियुक्तीनंतर जे.पी.नड्डा यांचा प्रथमच मुंबईत दौरा आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हेसुद्धा मुंबई दौऱ्यावर आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami