संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जून महिन्यात देशातील दीड कोटी लोकांनी रोजगार गमावला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जून महिन्यात देशातील बेरोजगारांच्या संख्येत मोठी भर पडली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण ८.३ टक्क्यांवर पोहोचले. मे महिन्यात ते ७.३० टक्के इतके होते. या महिनाभरात कृषी क्षेत्रात जवळपास दीड कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला.

याबाबतीत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील परिस्थिती थोडीफार चांगली आहे. मे महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण ७.१२ टक्के होते, जे जूनमध्ये ७.३ टक्के झाले. सीएमआयईचे संचालक महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नसलेल्या महिन्यांपैकी रोजगाराच्या प्रमाणात झालेली ही सर्वात मोठी घट आहे. मान्सूनमुळे कामगारांची संख्या घटली आहे, हे चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, देशात सर्वाधिक म्हणजे ३०.६ टक्के बेरोजगारी हरियाणामध्ये आहे. त्याखालोखाल राजस्थानमध्ये २९.८ टक्के, आसाममध्ये १७.२ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये १७.२ टक्के, तर बिहारमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १४ टक्के आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami