संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

जूनमध्ये चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी आज पुण्यात आले होते.तेथे त्यांनी वाहतुकीचा समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला आणि वाहतूककोंडीला कारणभूत ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाणपूल येत्या दोन-तीन दिवसांत पाडणार असून त्यासाठी नवे कामदेखील लवकर सुरु करणार आहे. लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना नितिन गडकरी म्हणाले की. पुणे शहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार आहे टाउन प्लॅनींगनुसार या सगळ्या मार्गाची रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून 100 उंचीवरून उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली. त्यासाठी निधी देण्यात येईल. नॅशनल हायवे बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचे देखील त्यांनी संगितलं.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami