संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

जीपमधून उडी मारुन 3 विद्यार्थिंनी जखमी! चालकावर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी : परभणीमध्ये धावत्या जीपमधून उड्या मारल्याने तीन मुली गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातून 10 मूली शाळेत जात होत्या. या मुलींना चांदज पाटी येथे उतरायचे होते. पण चालकाला सांगूनही त्याने गाडी न थांबवता पुढच्या दिशेने वळवली. त्यामुळे तीन मुलींनी धावत्या जीपमधून उडी मारली. यामध्ये मूली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रीडज येथील दहा मुली शाळेसाठी बोरीकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या प्रवासी जीपमध्ये बसल्या. या मुलींना चांदज पाटीवर उतरायचे होते. परंतु जीप चालकाने सांगूनही गाडी न थांबवता जिंतूरकडे गाडी वळवल्याने घाबरून मनीषा खापरे, दीपाली मुटकुळे, मेघना शेवाळे या 3 मुलींनी धावत्या जीपमधून उडी मारली. धावत्या पीकअपमधून तिघींनीही उडी घेतल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.  दीपाली आणि मनीषा या दोघींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दीपाली मुटकुळे आणि मेघना शेवाळे या दोघींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करून डिस्चार्ज देण्यात आला. मनीषावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर सदर जीप चालकानेच या मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच त्याने पोलीस ठाण्यात जाऊनही माहिती दिली. दरम्यान, जीपचा चालक किशन पानपट्टे याच्या कानावर हेडफोन होते. ज्यावेळी मुलींनी गावच्या पाटीवर जीप थांबवण्यासाठी आवाज दिला तेव्हा तो आवाज त्याला हेडफोनमुळे ऐकू आला नाही त्याने गाडी पुढे चालू ठेवली आणि यातूनच हा प्रकार घडला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा या चालकावर दाखल केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami