संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जीएसटीमुळे पाकिटबंद अन्न, गहू, गूळ, पनीर, मासे महागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्राच्या मंत्रीगटाने केलेल्या शिफारशीनुसार जीएसटी लागू होणार असल्याने पाकीटबंद अन्न, मांस, मासे, पनीर, सुकवलेल्या भाज्या, एलईडी बल्ब, हॉटेल, खाद्य तेल आदी महागणार आहे. त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत मंत्रीगटाने जीएसटीबाबत केलेल्या शिफारसी मंजूर केल्या. त्यामुळे मांस, मासळी, दही, पनीर, मध, सुकवलेल्या भाज्या, गहू, गूळ आदी पाकीटबंद अन्नपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावला जाणार आहे. बँकेच्या चेकबुकवरील शुल्कावर १८ टक्के आणि नकाशा, चार्ट, हॉटेलच्या खोल्यांसाठी १२ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. खाद्य तेल, एलईडी बल्ब, प्रिंटिंग आणि चित्रकलेसाठी लागणारी शाई आदींच्या शुल्क रचनेत सुधारणा करण्याची शिफारस मंत्रीगटाने केली आहे. त्यानुसार हा जीएसटी लागू होणार असल्याने या वस्तू महागणार आहेत. गैरभाजपा राज्य सरकारांनी जीएसटी नुकसान म्हणून ७० ते ८० टक्के महसूल भरपाईची मागणी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami