संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जीएसटीचे पैसे देण्याचा करार जुलैमध्येसंपणार ! मुंबई महापालिका अडचणीत ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – केंद्र सरकारने जुलै २०१७ पासून देशभरात जीएसटी म्हणजेच स्थानिक स्वराज्य कर लागू केली आहे. मात्र यामुळे पूर्वीचा जकात कर बंद करावा लागल्याने होणाऱ्या नुकसानीची भरपाई संबंधीत राज्यांना केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी करार केला होता.त्याची मुदत येत्या जुलै महिन्यात संपणार असल्याने सर्वच राज्यांना चिंता लागून राहिली आहे.यामध्ये महाराष्ट्राचे राजधानी शहर मुंबई अडचणीत येण्याची शक्यता आहे.जुलैनंतर कराराची मुदत वाढवली गेली नाही नंतर राज्य सरकार मुंबई महापालिकेला पैसे कसे देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेला जकात कर जीएसटीमुळे बंद झाला आहे.त्यामुळे मुंबई महापालिकेला भरपाई म्हणून केंद्राकडून मिळणाऱ्या रकमेतून राज्य सरकार ५ जुलै २०१७ पासून महिन्याला ६४७ कोटी रुपये देत आहे.त्यात प्रत्येक वर्षी ८ टक्के वाढ केली जात आहे.म्हणजेच दरवषी ८ ते १० कोटी रुपये वाढीव मिळत आहेत.पण आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेला नुकसान भरपाई करारच जुलै मध्ये संपुष्टात येणार आहे,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली.मात्र आता या जीएसटी नुकसान भरपाई करारला मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami