संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जिवंत पत्नींचे पतींकडून पिंडदान! बाणगंगेला कार्यक्रम स्मृतीतून सुटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पितृपक्षाचे निमित्त साधन वैतागलेल्या 50 पतींनी मुंबईच्या बाणगंगा तळ्याजवळ आपल्या पत्नींचे पिंडदान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या पितृपक्ष सुरू असून या प्रथेचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेत आपल्या पत्नीला वैतागलेल्या 50 पतींनी मनातील भावनांना वाट मोकळी करून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील बाणगंगा तळ्याजवळ काही पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपल्या पतींचे पिंडदान केले. मुंबईतील पत्नी पीडितांची संस्था असणाऱ्या वास्तव फाउंडेशनकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंडदानासाठी आलेल्या बहुतांश पुरुषांचा एक तर घटस्फोट झाला आहे किंवा प्रलंबित आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या पत्नीशी न पटल्याने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय या पुरुषांनी घेतला आहे. या पुरुषांपैकी एकाने तर स्वतःचे मुंडनही करून घेतले. इतरांनी मात्र केवळ या विधीत सहभाग घेतला. आपल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट मिळाला असला तरीसुद्धा तिने दिलेल्या त्रासदायक आठवणींपासून कायमस्वरूपी सुटका मिळण्यासाठी आम्ही पिंडदान करत असल्याचे या पतींनी म्हटले आहे. वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष आणि देशपांडे म्हणाले की, इथे पिंडदान करावयास आलेले सर्व पुरुष हे एक तर घटस्फोटित आहेत किंवा त्यांचा घटस्फोट कोर्टात प्रलंबित आहे.हे सर्वजण पत्नीने दिलेल्या त्रासापासून आणि त्या त्रासाच्या आठवणींपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ इच्छितात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami