संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील १० मध्यम धरण प्रकल्प ओव्हरफ्लो

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव – यंदा सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. यामुळे बहुतांश नद्यांना देखील पुल आले आहेत. यामुळे जिल्‍ह्यातील गेलेल्‍या गिरणा नदीवरील धरण देखील सलग चौथ्‍या वर्षी शंभर टक्‍के भरले आहे. आतापर्यंत झालेल्‍या पावसामुळे जिल्‍ह्यातील १३ मध्‍यम धरण प्रकल्‍पांपैकी दहा प्रकल्‍प हे ओव्‍हरफ्लो झाले आहेत.

सध्‍या परतीच्‍या पावसाला सुरवात झाली आहे. या दरम्‍यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मध्यम प्रकल्पातील साठा देखील ९५ टक्के झाला आहे. तर मोठ्या प्रकल्पांचा साठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळेच जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात अभोरा, सुकी, मोर, मंगरूळ, अग्नावती, हिवरा, अंजनी, बोरी, तोंडापूर आणि मन्याड हे दहा धरण प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

गतवर्षी देखील चांगला पाऊस झाल्‍याने प्रकल्पांमध्ये ९० टक्के जलसाठा होता. यंदा आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात एकूण जलसाठा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या ऑक्टोबर मध्‍यंतरापर्यंत परतीचा पाऊस असण्याची शक्‍यता वर्तविली असून त्यामुळे हा जलसाठा १०० टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami