संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

जालना-अंबड महामार्गावर
यात्रा स्पेशल एसटी उलटली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*३० प्रवासी जखमी

जालना- अंबड- जालना महामार्गावर एसटी महामंडळाच्या गेवराई आगाराच्या यात्रा स्पेशल बसला आज गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. एसटी उलटून झालेल्या या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालन्याहून बीडकडे जाणाऱ्या महामंडळाच्या गेवराई आगाराच्या यात्रा स्पेशल बसला गोलापांगरी टोलनाक्या अंबडकडून येणाऱ्या जड वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यांमध्ये जाऊन उलटल्याची घटना घडली. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि जालना आगाराचे कर्मचारी दाखल झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या