संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगांची शिफारस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन – जागतिक महासत्ता देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल गुरूवारी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी घोषणा केली आहे यावेळी जो बायडन यांनी अजय बंगा यांच्या आर्थिक समावेशन करण्याच्या कौशल्याचे कौतुक केले.दरम्यान, जागतिक बँकेने गेल्या आठवड्यात डेव्हिड मालपास यांचा राजीनामा जाहीर केला होता.त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन अध्यक्ष निवडणे गरजेचे आहे.

अजय बंगा हे भारतीय वंशाचे असून पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. अजय बंगा यांनी जनरल अटलांटिक या अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मास्टरकार्डचे त्यांनी १२ वर्षे नेतृत्व केले. डिसेंबर २०२१ मध्ये ते मास्टरकार्डमधून निवृत्त झाले.त्याठिकाणी त्यांनी २०२५ पर्यंत १ अब्ज लोक आणि ५० दशलक्ष सूक्ष्म आणि लघु व्यवसायांना डिजिटल अर्थव्यवस्थेत आणण्याचे लक्ष्य ठेवले होते.अमेरिकेचे जेनेट येलेन याबाबत बोलताना म्हणाले, मास्टरकार्डमधील बंगा यांचा अनुभव आणि हवामान उपायांमध्ये खाजगी भांडवल तैनात करण्याचे त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे.त्यांचे हे कौशल्य गरिबी दूर करणे आणि सामायिक समृद्धी वाढवण्याचे जागतिक बँकेचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या