संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

जागतिक दूध उत्पादनात भारत अव्वल
केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांची माहिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला. जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा २४ टक्के वाटा आहे. जागतिक दूध उत्पादनात भारत हा प्रथम स्थानी आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत याबाबत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. वर्ष २०२१- २२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पदनात २४ टक्के योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला. वर्ष २०१४- १५ ते २०२१-२२ अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन २२ कोटी टनांपर्यंत वाढल्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले.
भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक करणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि राजस्थानकडे पाहिले जाते. भारतात उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान दूध उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर तर आंध्र प्रदेश पाचवा क्रमांक आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून सांगण्यात आले.
दुग्ध क्षेत्रात महिलांचे खरे योगदान
देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा आहे. भारताच्या दुग्ध विकास क्षेत्राचे खरे नेतृत्व महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे ७० टक्के प्रतिनिधित्व असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या