संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

जव्हार शहरात बिबट्या दिसला
ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर- जिल्ह्यात ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे असल्याने वन्यजीव मुक्त संचार करताना अधून मधून दिसतात.मात्र भर जव्हार शहरातच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.शहरातील सोनार आळी भागात मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले आढळून आली.
जव्हार शहरातील सोनार आळीतील पहाटे कुत्री भुंकू लागली.त्यामुळे जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या मादी व दोन पिल्लू दिसून आली. जंगलात आताच्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. सोबत शिकारीच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून ही मादी बिबट्या जव्हारलगतच्या परिसरात पाहावयास मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागातर्फे सूचना जारी करण्यात आली आहे. रात्री उशिरा घराबाहेर पडू नये, घराबाहेर कचरा किंवा पाळीव प्राणी ठेऊ नयेत, घराभोवती पुरेसा विद्युतप्रकाश असावा, साधा डबा वाजविला तरी बिबट्या पळून जातो.त्यामुळे वन्यप्राण्यास इजा करणे किंवा शिकार करणे हा गुन्हा आहे, काही अतिप्रसंग उत्पन्न झाल्यास वन क्षेत्रपाल यांना संपर्क साधावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान,वन विभागानेही या घटनेची गंभीर दखल घेत या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या