जळगाव:-जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहे.जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिवसेना शिंदे गट यांच्यात आमने- सामने लढत होणार आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध छाया गुलाबराव देवकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच दूध संघात या लढतीकडे लक्ष राहणार आहे.
जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि काही आमदार मैदानात उतरल्याने एकनाथ खडसे एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.