संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

जर्मनी आणि डेन्मार्कला जोडणारा जगातील सर्वात मोठा समुद्री बोगदा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बर्लिन – बाल्टिक समुद्राच्या ४० मीटर खोल भागात जगातील सर्वांत मोठा समुद्री बोगदा तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हा बोगदा डेन्मार्क आणि जर्मनी या देशांना जोडणार आहे.या बोगद्याचे काम २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे.जगातील सर्वात जास्त लांबीचा समुद्राखालील बोगदा असून त्याचे नाव फेह्मर्न बेल्ट फिक्स्ड लिंक टनेल असे असणार आहे.
विशेष म्हणजे या समुद्राखालील बोगद्यात रस्ते वाहतूक आणि रेल्वे अशी दोन्ही प्रकारची सुविधा असणार आहे.जर्मनीतील फेहमर्न आणि डेन्मार्कमधील लोलंड या बेटांना जोडणारा हा बोगदा असणार आहे.सध्या या दोन्ही देशातील लोक इकडून तिकडे जाण्यासाठी बोटीचा वापर करत आहेत आणि त्यासाठी ४५ ते ६० मिनिटाचा कालावधी लागतो.मात्र आता या नव्या बोगद्यामुळे हा वेल्क्मी होणार आहे.या प्रवासाठी फक्त ७ ते १० मिनिटे लागणार आहेत.या बोगद्याच्या कामावर तब्बल १० वर्षे नुकते संशोधन करण्यात आले असून २०२० पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.या बोगद्याच्या खर्चासाठी युरोपीय महासंघाने १.१ बिलियन युरोची गुंतवणूक केली आहे.युरोपियन युनियनच्या टेन–टी या कार्यक्रमाचाच एक भाग हा प्रकल्प आहे. दुसरी फायद्याची गोष्ट म्हणजे सध्या कोपरहेगन ते हम्बर्गपर्यतच्या रेल्वे प्रवासाला पाच तासांचा वेळ लागतो.तो प्रवास आता या बोगद्यामुळे दोन तासांत होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami