संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जय मल्हारच्या जयघोषात ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरीत पोहोचली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी आज जेजुरीत पोहोचली. सासवड सोडताच वारकर्‍यांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल यवतमध्ये मुक्काम होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान केले. त्यानंतर वरवंडमध्ये तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे.

सासवडमध्ये बंधू सोपान काकांच्या प्रस्थान झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी माऊलींचे प्रस्थान केले. त्यानंतर पालखी गावच्या वेशीवर खांद्यावर आणली आणि पुन्हा रथामध्ये ठेवली. सायंकाळी जेजुरी नगरीमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचली. पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांनी पालखीचे भव्य स्वागत केलेे. माऊलीच्या पालखी वर भंडारा उधळला गेली, जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी पालखी मुक्कामी राहिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami