कोल्हापूर – कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास ढगफुटी झाली. त्यात केवळ दीड तासात ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवड, उमळवाड परिसर जलमय झाला. सांगली-कोल्हापूर बायपास पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. जयसिंगपूरमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले.
शिरूर तालुका आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस सुरू झाला. अवघ्या दीड तासात ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. संपूर्ण भाग जलमय झाला. सांगली-कोल्हापूर बायपास मार्ग ओढ्याच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे येथील वाहतूक बंद पडली. उदगाव-रेल्वे स्टेशन, चिंचवड-शिरोळ, उदगाव-उमळवाड येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. जयसिंगपूर शहरातील घरे, दुकाने आणि शोरूममध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री पडलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.