संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

जयप्रभा स्टुडिओ आंदोलनात चित्रकर्मींचा आत्मदहनाचा प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यात येत होता. या स्टुडियोच्या जागेची विक्री झाली आहे. मात्र तो कोणी विकत घेतला याच्याशी आमचे देणेघेणे नाही. पण या स्टुडियोच्या जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून स्टुडियोच्या विक्रीपासून करण्यात आली आहे. या मागणीसाठी कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनाचा२५० व दिवस होता. शासनाकडून अद्याप कोणतीच दाखल घेतली नसल्याने अखेर आज या आंदोलनाचा भडका उडाला. यावेळी आंदोलन करणाऱ्या चित्रकर्मींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपट सृष्टीचा वैभवशाली इतिहास असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे जतन करण्यात यावे, ही स्टुडियोची जागा कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे. या जागेवर पुन्हा चित्रीकरणच सुरु करण्यात यावे या मागणीसाठी जयप्रभा स्टुडिओ समोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गेल्या सोमवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व चित्रपट कलाप्रेमी यांच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देऊन जयप्रभा स्टुडिओ संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह अन्य प्रमुख कार्यवाह आदींकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.

दरम्यान, जयप्रभा स्टुडिओची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून र येथे जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आजचा २५१ वा आंदोलनाचा दिवस होता. या आंदोलनाची स्थानिक आमदार, शासकीय पातळीवर कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे चित्रपट कलाप्रेमी खदखद जाणवत होती. त्यातून आज आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्या चित्रकर्मींनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. आत्मदहन करण्याचा इशारा देत त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र वेलीच इतर आंदोलन चित्रकर्मींनी धाव घेऊन त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखलेअसल्याचे समजते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami