संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

जम्मू काश्मीरमध्ये 3.6
तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर: जम्मू-काश्मिरात शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वीही डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

जम्मू-काश्मीर सोबतच देशातील गुजरात आणि सिक्कीममध्ये देखील गेल्या काही दिवसात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुजरातच्या सूरतमध्ये 11 फेब्रुवारी रोजी 3.8 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. तर 13 फेब्रुवारी रोजी सिक्कमीमध्ये 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. सिक्कीमच्या युकसोममध्ये पहाटे 4.15 वाजता जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता गुजरातमध्ये बसलेल्या धक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या