संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारतीय नौदल आणि डीआरजीओने शुक्रवारी जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चांदीपूर किनारपट्टीवरून एका युद्धनौकेवरून करण्यात आली.

शॉर्ट रेंज सरफेस टू एयर या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश भारतीय नौदलाच्या युद्धनौका तैनात करणे हा आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या 3 विभागांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास केला आहे. या क्षेपणास्त्रामध्ये समुद्रातील स्किमिंग लक्ष्यांसह जवळच्या अंतरावर विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता आहे. 40 ते 50 किमी आणि सुमारे 15 किमीच्या उंचीवर हाय-स्पीड हवाई लक्ष्यांवर मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आली आहे. याची रचना अ‍ॅस्ट्रा क्षेपणास्त्रावर आधारित आहे. जी व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, असे डीआरडीओच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami