संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

जमिनीवरुन झाडलेली गोळी थेट विमानातील प्रवाशाला लागली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

* ३५०० फुट उंचीवरून उड्डाण करत होते विमान

नाएप्यीडॉ – म्यानमारमध्ये एक चकीत करणारी धक्कादायक घटना घडली आहे.एका व्यक्तीने जमिनीवरून थेट विमानावर गोळीबार केला.यात झाडलेली गोळी तब्बल ३५०० फुट उंचीवरून उडत असलेल्या विमानातील एका प्रवाशाला लागली. ‘द सन’च्या वृत्तानुसार म्यानमार नॅशनल एअरलाइन्सचे विमान ६३ प्रवाशांना घेऊन लोईकाव विमानतळावर उतरणार होते तेव्हा ही संपूर्ण घटना घडली. हा गोळीबार बंडखोर गटांनी केल्याचा आरोप म्यानमारमधील सैन्य राजवटीने केला आहे.
लोईकाव येथील म्यानमार नॅशनल कार्यालयाने सांगतिले की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. म्यानमारच्या लष्करी सरकारने बंडखोर गटावर विमानावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. परंतु,बंडखोर गटांनी हे आरोप नाकारले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी परिषदेचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, “प्रवासी विमानावरील हल्ल्याचा हा प्रकार गुन्हा आहे.या घटनेचा निषेध केला पाहिजे. या गोळीबारात तो प्रवाशी जखमी झाला असून अन्य प्रवाशांना कुठलीच इजा झालेली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami