जबलपूर – मध्य प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात दिंडोरी, जबलपूर, मांडला, अनुपपूर, बालाघाट आणि उमरिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी नोंदवली जात आहे. त्याचे केंद्र दिंडोरी होते. येथे सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी 50 सेकंदाच्या भूकंपामुळे अनेक लोक घराबाहेर पडले.त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.