संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

जगावर आर्थिक महामंदीचे सावट! जेपी मॉर्गनच्या सीईओचे भाकीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- जगात लवकरच मंदी येण्याची शक्यता अनेक अर्थ तज्ज्ञांनी वर्तवली आहे. असे असताना जे. पी. मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग अधिक गडद होत असल्याचा गर्भित इशारा दिला आहे. पुढील वर्षी मध्यापर्यंत अमेरिका व जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दुष्टचक्रात अडकेल, असे भाकीत त्यांनी केले आहे. वाढती महागाई, वाढणारे व्याजदर, युक्रेनवर रशियाने केलेले आक्रमण आणि फेडरल रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण हे सर्वच संभाव्य महामंदीचे संकेत देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

वाढणारी महागाई आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील प्रमुख बँका वाढवत असलेले व्याजदर. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अशा खूप गंभीर गोष्टी अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेला धोकादायक ठरू शकतात. युरोप अगोदरच मंदीच्या भोगऱ्यात अडकला आहे. पुढील ६ ते ९ महिने कोणत्या ना कोणत्या कारणाने युरोप अमेरिकेला मंदीत ठेवण्याची शक्यता आहे. एस अँड पी ५०० निर्देशांक सुमारे २४ टक्के घसरला आहे. सर्व यूएस निर्देशांक मंदी दर्शवत आहेत. अमेरिकेच्या शेअर बाजारांची आणखी २० टक्के घसरण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या पातळीपासून डाऊजोन्स आणि नेसडॅक आणखी २० टक्के घसरण्याची शक्यता आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी ही घसरण वेदनादायी ठरू शकते. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी आर्थिक चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. जेपी मॉर्गन इन्व्हेस्टमेंटने जुलैपासून बँकांचे समभाग खरेदी करण्याचे थांबवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami