संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

जगातील सर्वात वृद्ध कासव 190 वर्षांचे झाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सेंल हेलेना – जोनाथन हे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव असल्याची अधिकृत घोषणा आधीच करण्यात आली आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कासवाची नोंद आहे. या कासवाचे वय 190 वर्ष असून हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे. हे कासव पृथ्वीवरील सर्वात वृद्ध असलेला जिवंत प्राणी आहे.
जोनाथन दक्षिण अटंलांटिकमधील सेंल हेलेना येथे आपला 190 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेे. नेपोलियनच्या मृत्यूनंतर या कासवाचा जन्म झाला होता. जोनाथन या कासवाच्या जन्माबाबत स्थानिक प्रशासनाकडे कोणतेही दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. जोनाथनचे वय याहून अधिक असण्याचीही शक्यता आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी कासवाच्या कवचावर केलेल्या संशोधनाच्या आधारे या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाला असावा. जोनाथन हे सेंट हेलेनाच्या गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान असलेल्या प्लांटेशन हाऊस येथे आरामदायी जीवन जगत आहेत. यासोबतच डेव्हिड, एम्मा आणि फ्रेड अशी आणखी तीन वृद्ध कासवंही येथे राहतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami