नवी दिल्ली- जागतिक स्तरावर मंदीच्या नावाखाली चालू फेब्रुवारी महिन्यापर्यंत तब्बल १७,४०० होऊन अधिक तंत्रज्ञान कर्मचार्यांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत.हे सर्वजण बेरोजगार बनले आहे.भारतातही पुढील काही दिवसांत मोठी नोकर कपात होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या फेब्रुवारी महिन्यात नोकर कपात होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांमध्ये बायजू,याहू, गोडॅडी, ओएलएक्स,गिटहब,ईबे आणि ऑटोडेस्कक आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे.२०२३ या चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यापर्यंत जगातील सुमारे ३४० कंपन्यांनी आपल्या १.१० लाख कर्मचार्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.त्यामध्ये गुगल,अमेझोन मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या जानेवारी महिन्यातच २८८ पेक्षा जास्त कंपन्यांनी रोज सरासरी ३३०० कर्मचार्यांना कामावरून काढले आहे.तसेच गेल्या वर्षी ११ हजार कर्मचार्यांना नारळ दिल्यानंतर आता मेटा कंपनी आणखी काही, कर्मचार्यांना कामावरून काढण्याचा विचार करत आहे.तसेच बोईंग आणि एचआर या कंपन्या यावर्षी २ हजार कर्मचार्यांना घरी बसविणार आहे.