संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे आज सोलापूरमध्ये प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंदापूर : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील मुक्कामानंतर काल सोमवारी पुण्यातील सराटी गावी मार्गस्थ झाला. आज मंगळवारी ५ जुलै रोजी पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या सर्वांच्या मुखी ‘माऊली’ हा एकच शब्द असतो. हाच शब्द घेऊन पोलिसांनी यावर्षी प्रथमच ‘माऊली स्क्वॉड’ची निर्मिती केली आहे. या पथकात २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. माऊली स्क्वॉडद्वारे गर्दी टाळून वारकऱ्यांचा मार्ग सुकर होणार आहे. याशिवाय वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा १५ ते २० लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज वर्तवला जात असून ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मंदिर परिसर, वाळवंट अशा इतर महत्वाच्या ठिकाणी १५४ सीसीटीव्हीची नजर ही वारीमध्ये असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami