संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जखमी वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणाऱ्या दिंडीत एक चारचाकी वाहन घुसल्याने झालेल्या अपघातात १४ हून अधिक वारकरी जखमी झाले होते. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार सुरू करा. गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ हून अधिक वारकरी जखमी झाले होते. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारीदेखील त्यांनी दर्शवली. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मात्र आषाढी वारी अगदी २-३ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पंढरपूरकडे जात असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे काही जखमी वारकऱ्यांची यंदा वारी मात्र चुकणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami