संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

जकार्तात भीषण आगीत मोठी मशीद जमीनदोस्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जकार्ता – इस्लामिक सेंटर येथील जामा मशिदीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये घडली.या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जकार्ता येथील इस्लामिक सेंटर परिसरात जामा मशिदीच्या घुमटाचे काम सुरु असताना ही आग लागली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण मशिदीच्या घुमटात पसरली. तेथून आगीचे धूर सर्वदूर परसले.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे आग आणखीच भडकली. आग लागल्या तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही वेळेनंतर मशिदी जमीनदोस्त झाली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami