रायपूर- छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष आणि सत्ताधारी काँग्रेसचे आमदार मनोज सिंह मांडवी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. काँग्रेसचे नेते सुशील आनंद शुक्ला यांनी ही माहिती दिली.
विधानसभेचे उपाध्यक्ष मांडवी शनिवारी रात्री कांकेर जिल्ह्यातील नथिया नावागाव या आपल्या मूळ गावी गेले होते. आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना धरमतरी येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मांडवी ३ वेळा बस्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. अजित जोगींच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवले होते.