संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

चौवीसव्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाला १९ सप्टेंबर पासून प्रारंभ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईच्या सुजाण प्रेक्षकांनी प्रतिक्षा करावी असे जे दोन-चार महोत्सव होत असतात त्यात कला, संस्कृती आणि विज्ञान यांचे संवर्धन करणाऱ्या नेहरू सेंटरचा अंर्तरभाव आहे. नृत्य, संगीत अन्य कलांना प्राधान्य देताना या संस्थेने नाट्य चळवळीला सुद्धा तेवढेच प्राधान्य दिले आहे. ‘राष्ट्रीय नाट्य महोत्सव’ हा त्यापैकी एक गौरवास्पद प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यात उर्जा, चेतना वाढविणारा हा उपक्रम आहे. रौप्य महोत्सवी महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या महोत्सवाचे यंदा चौवीसवे वर्ष आहे. कोविड साथीच्या आजारामुळे आलेल्या निर्बंधामुळे हा लौकिक प्राप्त महोत्सव काही होऊ शकला नाही. आता पुन्हा या महोत्सवाला प्रारंभ होत आहे. राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या मराठी, हिंदी, गुजराती अशा पाच नाटकांचा या महोत्सवात समावेश आहे. १९ ते २३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत वरळी, नेहरू सेंटरच्या आलिशान नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. दररोज ७ वाजता विनामूल्य प्रेक्षकांना या दर्जेदार विविध भाषीक नाटकांचा आनंद घेता येईल. महोत्सवात साम्राज्यम्, हसता हा सवता दोन मराठी नाटकांच्यासोबत, आधे अधूरे, दृष्टी – दान या दोन हिंदी नाटकांचा समावेश आहे. ‘पप्पा मारा पुष्पराज’ हे गुजराती नाटक सुद्धा यात सादर केले जाणार आहे. महोत्सवात सादर होणारे नाटके व्यावसायिक, प्रायोगिक रंगपंचावर यशस्वी झालेली आहेत. त्याचा एकत्रित आविष्कार हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami