संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जालना – तालुक्यातील मानदेऊळगाव येथील डोळस यांच्या घराजवळ पाऊस आल्‍याने आडोशाला उभ्या असलेल्या तरुणाला चोर समजून लाठ्या काढ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका आदिवासी तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

संजय प्रभाकर पवार असे मृत्यू पावलेल्या आदिवासी तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांनी पोलिसांना चोरी करणाऱ्या चोराला लोकांनी मारहाण केल्याचा माहिती दिली. त्यानंतर चंदणझिरा पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली असता तरुणाचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत्यूदेह जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केला.पवार यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती आज दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी जालना शासकीय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी मयत संजयचा भाऊ रामेश्वर पवार यांनी आपला भाऊ पाऊस आल्‍याने आडोशाला उभा असतांना तीन जणांनी त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केला असल्याची फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी संशयित तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फिर्यादीनंतर विभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह चंदणझिरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी अधिक तापस करत आरोपीचा शोध सुरू केला असून या प्रकरणी अधिक तपास चंदनझिरा पोलिस करत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami