चैन्नई- आज पुन्हा चैन्नईसह आजबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना गोंधळ उडाला. तेथील धरणं आणि बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडूच्या थेेनी, डिंडीगूल, मदुरै, शिंवगंगा, रामनाथपुरम येथे पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.थेनीच्या वैगई बंधाऱ्यातून 4.230 क्यूसेकचे पाणी सोडले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून चैन्नईत अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असताना आज सकाळी तेथे पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने तेथील नागरिक हैराण झाले आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून लोकांना आपली वाट काढावी लागली. गाडी चालवताना चालकांची चांगलीच दमछाक झाली. पावसामुळे कोयंबटूरमधील बंधारा ओवरफ्लो झाला असून तेथील लोकांना स्थानिक प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना दक्षिण आंध्र प्रदेश-उत्तर तामिळनाडु-पुडुचेरीच्या समुद्रात जाऊ नये,असे हवामान विभागाने सांगितले.