संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

चेंबूरमध्ये दरड कोसळली! दोन जण गंभीर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – चेंबूरमधील वाशी नाका परिसरातील न्यू भारतनगरमध्ये आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका झोपडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले.जखमींवर पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत झोपडीतील गंभीर जखमी झालेल्यांची नावे: अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती अशी असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत.चेंबुरच्या न्यू भारतनगरमध्ये पहाटे ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे.या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चेंबुर येथील ही झोपडपट्टी डोंगरी पट्ट्यात भागात येते. याआधीही या विभागात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडून गेल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात म्हणून याअगोदरही प्रशासनाने नागरिकांना येथून स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता मुंबईमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.या घटनेत दरड कोसळल्यानंतर एक मोठा दगड प्रजापती कुटुंबीयांच्या घरात घुसला. यात हे दोघे भाऊ जखमी झाले असून सायन रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आता प्रशासन कोणता निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami