संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

चुकीचे पार्किंग दाखवा, ५०० रुपये मिळवा! गडकरींची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान चुकीच्या पार्किंगविरोधात मोठी घोषणा केली. ते म्हणाल, जी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल तिला १००० रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या पार्किंगची मोठी समस्या बनली आहे. यावेळी त्यांनी वाहनांची वाढती संख्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली. शहरी भागातील कारच्या वाढत्या संख्येमुळे चुकीच्या पार्किंगचे प्रकार घडत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे कार असली तरी ते पार्किंगसाठी जागा तयार करत नाहीत. म्हणूनच आता चुकीच्या पार्किंगबाबत लवकरच कायदा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, आपल्या देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांना शिस्त नसल्याचे वेळोवेळी पहायला मिळते. मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आता अशा प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. ते म्हणाले, ‘जी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला १०० रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. अनेक लोक आपल्या गाडीसाठी पार्किंगची सोय करत नाहीत, त्याऐवजी गाडी रस्त्यावर उभी करतात आणि बेजबादारपणे वागतात, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami