संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

चीन सीमेवर कर्तव्य बजावताना यवतमाळच्या जवानाला वीरमरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना यवतमाळच्या जवान शहीद झाला आहे. लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचा 16000 फूट उंचीवर ड्यूटीवर असताना श्वासोच्छवासाचा त्रास सुरु झाला. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या जवानाला वीरमरण आले.

यवतमाळ जिल्ह्यातील वनी इथे राहणारे कर्नल वासुदेव आवारी भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली होती. ते अरुणाचल प्रदेशातील भारत चीन बॉर्डरवर समुद्र पातळीवरून 16000 फूट उंचीवर कर्तव्य बजावत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ गुवाहाटीतील 151 मिलिटरी बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी कामठी मिलिटरी बेस्टतर्फे त्यांना मानवंदना व सलामी दिली . लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाच वाजता वनी इथे पोहोचले.लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर उद्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता त्यांच्या मुळगावी मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami