तझाकिस्तान – तुर्की आणि सीरीयानंतर आज सकाळी चीन भूकंपाच्या धक्क्याने हादरले. चीन आणि तझाकिस्तानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. हा भूकंप ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. मात्र, या भूकंपात कोणतेही जीवित हानी झालेली नाही.
चीनमधील तझाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांगमध्ये आज सकाळी ८:३० च्या सुमारास ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. तर तजाकिस्तानला देखील भूकंपाचे धक्के बसले. तसेच उइगर येथेही या भूकंपाचे धक्के जाणवले. तझाकिस्तान हा परिसर डोंगराळ असून या परिसरात मानवीवस्ती नाही. त्यामुळे येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.