संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

चीनी वटवाघळांमध्ये आढळला नवा विषाणू! शास्त्रज्ञांचा दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग- दोन वर्ष देशासह जगात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. अशातच शास्त्रज्ञांना चीनच्या वटवाघळांमध्ये नवीन विषाणू सापडला आहे. हा विषाणू कोरोनासदृष्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. हा विषाणू कोरोनाप्रमाणाचे माणसांमध्ये पसरू शकतो. तसेच तो कोरोना इतकाच घातक असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चीनच्या युनान प्रांतात चिनी आणि ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी 149 वटवाघळांचे नमुने घेतले. या नमुन्यांच्या अभ्यासामध्ये त्यात पाच विषाणू आढळून आले आहेत. हे विषाणू माणव आणि प्राण्यांसाठी धोकादायक असून, ते कोरोना विषाणू प्रमाणेच रोग पसरवू शकतात असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणूंमध्ये बीटीएसवाय2 नावाचा विषाणू हा सार्स-कोव-2 शी संबंधित आहे. याच विषाणूमुळे जगभरात कोरोना सारख्या गंभीर आजाराचा फैलाव झाला होता. कोरोनासारखे विषाणू अजूनही चीनी वटवाघळांमध्ये फीरत आहेत. त्यामुळे कोरोना सारखा किंवा त्याच्यापेक्षाही भयंकर एखादा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती याबाबत बोलताना सिडनी विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ प्रोफेसर एडी होम्स यांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami