वॉशिंग्टन : लोडशेडिंग वीजटंचाईची समस्या सर्वांनाच भेडसावत असते.मात्र आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे.कारण फक्त एक ग्लास पाण्यातून घराला वर्षभर पुरेल इतकी वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. चीनपाठोपाठ अमेरिकेमध्ये न्यूक्लिअर फ्यूजनपासून ऊर्जानिर्मिती करण्यास संशोधकांना यश आले आहे. अमेरिकेच्या प्रयोगशाळेमध्ये न्यूक्लिअर फ्यूजनपासून ऊर्जानिर्मिती करण्याला आला आहे.
प्रयोगासाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा प्रयोगातून मुक्त झालेली ऊर्जा अधिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.ही वीज अणूऊर्जेपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. भविष्यात स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीचे हे पहिले पाऊल ठरणार आहे. यावर अधिक संशोधन होऊन जर निर्मिती प्रकल्प अस्तित्वात आला तर फक्त एक ग्लास पाण्यातून घराला वर्षभर पुरेल इतकी वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.ही वीज निर्मिती करताना ड्यूटेरिअम,ट्रीटियम आयसोटोप्समध्ये संयोग प्रक्रिया करुन तयार झालेल्या ऊर्जेपासून वाफ तयार करुन वीजनिर्मिती केली जाणार आहे.त्यामुळे ही ऊर्जा घातक नसल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे.