संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द ! प्रवाशी संतप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*सर्व प्रवासी वर्गाला मोठा मानसिक व आर्थिक त्रास

कणकवली – खराब हवामानाच्या कारणावरून परवा बुधवारी चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.हवाई प्राधिकरण प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोकणात आलेल्या गणेशभक्तांनी विमानाने प्रवास करताना हवामानाचा अंदाज घेऊनच तिकिटे बुक करावी असे आवाहन केले आहे.
बुधवारी सायंकाळी मुंबईसाठी उड्डाण भरणाऱ्या विमानातून प्रवास करणारे प्रवासी दुपारी दोन वाजताच विमानतळावर पोहचले होते. मात्र फक्त दहा मिनिटे उशिरा हे विमान जाणार असल्याचे सांगत सायंकाळी अचानक हे विमानच रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.यावेळी खराब हवामान असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.विशेष म्हणजे या विमानतळावर अजून साधी कॅन्टीनची सोयही करण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रवाशी वर्ग संताप व्यक्त करत होता.तरी विमानतळ प्राधिकरणाने चिपी विमानतळावर प्रवाशांसाठी अत्यवश्यक सुविधा पुरवत पहिल्यांदा कॅन्टीनची सोय केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी केली.विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक सहन करावा लागला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami