संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

चासकमान धरण पुन्हा भरलेनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण पुन्हा शंभर टक्के भरले आहे. त्यामळे चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून आज शनिवारी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून ९२५ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच विद्युत विमोचकातून ८५० क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यापैकी ५७० क्युसेक्स धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे विसर्ग चालू आहे. २८० क्युसेक्स ०/८१० मधील अतिवाहक मधून नदीत सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रात एकुण १२०५ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात पाऊस वाढल्यास व धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार नदी पात्रात विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami