संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

चालू वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीत २५ ऑक्टोबरला दिसणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी सण साजरा केला जातो.त्यानुसार यंदा दिवाळी २४ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबरला होणार आहे.

हिंदु कालगणनेनुसार,२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.२९ वाजता सूर्यग्रहण होईल आणि दुपारी ५.२० वाजता समाप्त होईल. म्हणजेच १ तास १४ मिनिटे हे सूर्यग्रहण असणार आहे.यादिवशी ग्रहण सुटल्यावर ५.४३ वाजता सूर्यास्त होणार आहे. यावेळी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण असून ते गोवर्धन पूजेच्या दिवशी संपणार आहे.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दिवाळी आणि गोवर्धन पूजेवर सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही.त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन आणि त्यानंतर गोवर्धन पूजन करू शकता. हे सूर्यग्रहण भारतात दिल्ली, बंगळुरू,कोलकाता,चेन्नई,
उज्जैन,वाराणसी आणि मथुरा या शहरांत दिसणार आहे.तसेच देशाचा पूर्व वगळता अन्य भागातही हे सूर्यग्रहण दिसणार आहे.

दरम्यान, सूर्यग्रहणाच्या आधी १२ तासांपूर्वीपासून ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाला सुतक काळ म्हणतात आणि या दिवशी अनेक गोष्टी टाळल्या जातात. या काळात घरामध्ये स्वयंपाक करू नये आणि केल्यास सर्व प्रकारच्या अन्नामध्ये तुळशीची पाने घालावीत. तसेच मंदिरात पूजा करू नये.परंतु देवाच्या मंत्राचा जप करावा.या काळात दात घासू नये,केस विंचरू नये, तसेच सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलेने घराबाहेर पडू नये आणि चुकूनही कोणतीही धारदार वस्तू किंवा साधन वापरू नये.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami