संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

चालत्या दुचाकीवर रील्स बनवणे
विद्यार्थ्यांना महागात! दोन ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी – दुचाकीवर रील तयार करणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावर २६ जानेवारी रोजी झेंडावंदनला एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील करताना भीषण अपघात झाला. हे विद्यार्थी नववी इयत्तेत शिकत होते. यामध्ये उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे गंभीर जखमी आहेत.

पाथरी सोनपेठ मार्गावर २६ जानेवरीच्या सकाळी शाळेत झेंडावंदनासाठी हे विद्यार्थी जात होते. यावेळी ते ‘मेला’ या चित्रपटातील ‘डर है तुझे किस बात का?’ या गाण्यावर रील करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाचे नाव शंतनू आहे. तर,आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ अपघातापूर्वीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका दुचाकीवर चारजणांनी प्रवास करणे आणि भरीस भर म्हणून त्यात मोबाईल वर रील बनवणे या चौघांना चांगलेच महागात पडले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या