संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

चालकांचे वेतन रखडवणाऱ्या कंत्राटदाराला बेस्टची नोटीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- भाडेतत्त्वावरील बेस्ट बसचालकांचे वेळेवर पगार देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. परंतु तो त्यांना वेळेवर पगार देत नसल्यामुळे ते संपावर जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. या प्रकरणी दंडाची कारवाई केल्यानंतरही काहीच फरक पडत नसल्याने बेस्ट प्रशासनाने अशा बेदरकार कंत्राटदाराला कंत्राट रद्द करण्यासंबंधी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे एमपी ग्रुप कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बेस्टने एमपी ग्रुपबरोबर भाडेतत्त्वावरील मिनी बससाठी करार केला आहे. करारानुसार कंत्रालदाराला चालकांना वेळेवर पगार व प्रवाशांना चांगली सेवा देणे बंधनकारक आहे. असे असताना संबंधित कंत्राटदार बस चालकांना वेळेवर पगार देत नाही. त्यामुळे ते संपावर जातात. याचा फटका प्रवाशांना बसतो. २८० मिनी बस भाडेतत्त्वावर चालवल्या जातात. पर्यावरण रक्षणासाठी बेस्टने हा निर्णय घेतला आहे. एमपी समूहाला या बसचे कंत्राट दिले आहे. त्याने चालकांना वेळेवर पगार आणि प्रवाशांना चांगली सेवा देणे अपेक्षित आहे. परंतु तसे घडत नाही. पगार मिळत नसल्यामुळे चालक संपावर जातात. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. सध्या २८० पैकी २६६ बस बंद आहेत. त्यामुळे कंत्राटदाराकडून दररोज ५ हजार रुपये प्रमाणे ३.५ कोटींचा दंड बेस्टने वसूल केला आहे. त्यानंतरही सुधारणा होत नसल्यामुळे बेस्टने नोटीस बजावून कंत्राट रद्द का करू नये, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे एमपी ग्रुपचे कंत्राट रद्द होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami