पुणे- चांदणी चौकातील पाडकाम नुकतंच पार पडलं. मात्र पुन्हा एकदा हा परिसर चर्चेत येत आहे. आजपासून पुण्यातील चांदणी चौकामधील वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यरात्री 12.30 ते 1 पर्यंत या वेळेत ही वाहतूक बंद ठेवण्यात येईल. दोन्ही बाजूंचे खडक फोडण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात येईल. साधारण 8 ते 10 दिवस दररोज अर्धा तास चांदणी चौक परिसरातील वाहतूक बंद असणार आहे. दरम्यान, वाहतुकीस अडथळा ठरत असलेला चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबर रोजी पाडण्यात आलेला होता. वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. पूल पाडला त्या ठिकाणी सातार्याहून मुंबईकडे जाण्यासाठी तीन लेन आहेत. तर मुंबईहून सातार्याच्या दिशेने जाण्यासाठी चार लेन आहेत