नवी दिल्ली – महागाईची झळ जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि सर्वच साधनांना बसत असते.पण आता भारतीय चलनी नोटांनाही महागाईचा फटका बसू लागला आहे.कारण गेल्या वर्षीपेक्षा या आर्थिक वर्षात नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला अधिकचा खर्च आला आहे.५० रुपयांच्या नोटेसाठी यंदा २३ टक्के खर्च वाढला आहे.१०,२० आणि ५० रुपयांच्या नोटांची छापाई महाग झाली आहे
यावेळी ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी खर्चात काहीच वाढ झालेली नाही. रिझर्व्ह बॅंकेने नोटा छापण्यासाठी एकूण गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांपेक्षा अधिकची रक्कम खर्च केली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.गेल्या आर्थिक वर्षात नोटा छपाईसाठी ४०१२.०९ कोटी रुपयांचा खर्च आला होता. पण यंदा हा खर्च वाढला आहे. केंद्र सरकारला नोटा खरेदीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे. या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला ४९८४.८ कोटी रुपयांचा खर्च आला. २०१७ मध्ये नोटबंदी दरम्यान केंद्रीय बँकेला मोठा खर्च आला होता. त्यावेळी आरबीआयला खर्च करण्यासाठी ७९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले होते. त्यापूर्वी नोटा छापण्यासाठी ३४२१ कोटी रुपये खर्च आला होता. नोटबंदीच्या काळात १३३ टक्के खर्च वाढला होता.