संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

घाटकोपर परिसरात सुसाट ओला कारने ८ जणांना उडवले,सर्व चालक जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील घाटकोपर परिसरात एका ओला चालकाने तब्बल आठ जणांना जोराची धडक दिल्याची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे.तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली होती.या घटनेची व्हिडीओ आता समोर आला आहे.
काल बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घाटकोपरच्या सुधापार्क परिसरात ही घटना घडली होती. तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली.जखमींना तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ओला चालक हा घाटकोपरच्या कामराज परिसरातील रहिवासी आहे.राजू यादव असे त्याचे नाव आहे. तो सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहने येतील, जी व्यक्ती येईल त्यांना उडवत तो हायवेच्या दिशेला निघून गेला होता. या चालकाने रस्त्याने शाळेत चालत जाणाऱ्या लहान मुलांना देखील सोडले नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता.पोलिसांनी संबंधित प्रकरणाची दखल घेवून ओला चालकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान, जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami