संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

घर घेण्यासाठी चीनची कंपनी चक्क टरबूज घेतेय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग – चीनमधील एक रिअल इस्टेट कंपनी ग्राहकांकडून पेमेंट म्हणून चक्क टरबूज घेत आहे. घर खरेदीदारांना गहू आणि लसणीच्या स्वरूपात डाउन पेमेंट करण्याचा पर्यायही या कंपनीने दिला आहे.

चीनच्या बाजारपेठेत भयंकर मंदी आली असून रिअल इस्टेट व्यवसायावर या मंदीचा मोठा परिणाम झाला आहे. लोक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. अशीच एक योजना म्हणून चीनमधील एक रिअल इस्टेट कंपनी पैसे म्हणून ग्राहकांकडून चक्क टरबूज घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक किलो टरबूज २० युआनच्या बरोबरीचे मानले गेले आहे. तर ज्यांना भारतीय रुपयानुसार व्यवहार करायचा आहे, त्यांच्यासाठी ३ किलोचा एक टरबूज म्हणजे ७०० रुपये असतील.

कंपनीने आपल्या प्रचार मोहिमेत म्हटले आहे की, नवीन घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांनाही टरबूज, लसूण आणि गहू डाऊन पेमेंट म्हणून वापरावे. जेणेकरून शेतकऱ्यांनाही लाभ मिळू शकेल. त्यांच्या प्रचाराचा उद्देश स्थानिक टरबूज शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हाच आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami